नांदेड,10- नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणा-या जिल्हा शिक्षक पुरस्कार (सन 2018) वितरण सोहळा रविवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. देगलूर येथील सिध्देश्वर मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री रामदास कदम यांची उपस्थिती राहणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावक यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, राम पाटील रातोळीकर, डी.पी.सावंत,.सुभाष साबणे, प्रदीप नाईक, वसंतराव चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर, अमिताताई चव्हाण, हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधिक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ सभापती समाधान जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, समाजकल्याण सभापती सौ. शीलाताई दिनेश निखाते, महिला व बालकल्याण सभापती सौ. मधुमती राजेश देशमुख कुंटूरकर, देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेठवार, यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली आहे. जिल्हा पुरस्कारासोबतच देगलूर तालुका शिक्षक पुरस्काराचेही वितरण या कार्यक्रमात केले जाणार आहे