जन लोकशाही संगठण चे अध्यक्ष सैय्यद नासीर यांचे निवेदन
निज़ाम साजिद
अकोला — डॉ अब्दुल कलामआज़ाद आर्थिक विकास महामंडळ चे प्रमुख चेअरमन हाजी हैदर आजम अकोल्यात आले होते यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले
भारत देशात भाजपा चे सरकार आल्यानंतर गौवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आणि त्याच कायद्याचा आधार घेत अनेक निरपराध लोकांच्या मोकळेपणाने हत्या करण्यात आल्या आहेत त्यावर प्रथमतः नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे तसेच मुस्लिम समाज विकासासाठी विद्य न्यायालयने 5 टक्के आरक्षण लागू केले आहे मात्र मुस्लिम लोकांना आतापर्यंत ही लाभ मिळाला नाही , मुस्लिम समाज मधील युवावर्गाला नॉकरीमध्ये आरक्षण दिले जावे मुस्लिम लोकांना विविध कर्ज देतांना जमानतदारची अट रद्द करण्यात यावी, मुस्लिम समाजातील गरीब लोकांना जातीयवाद प्रतिबंधक कायदा नुसार संरक्षण मिळावे ,मुस्लिम मदरसा साठी शासनस्तरावर आर्थिक सहायता देण्यात यावी, तसेच मदरसा मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ति लागु करण्यात यावी,आणि शिक्षक यांना शासन नियमों प्रमाणे पगार देण्यात यावेत ,मुस्लिम समाज परिसरमध्ये सुसज्ज वाचनालयची निर्मिति करण्यात यावी,।मुस्लिम समाज परिसरमध्ये उर्दू भाषामध्ये आंगनवाड़ी केंद्र सुरु करण्यात यावेत असे अनेक विषयांवर डॉ अब्दुल कलाम आजाद आर्थिक विकास महामंडल राज्य प्रमुख चेअरमन हाजी हैदर आजम यांना जन लोकशाही संगठन चे संस्थापक अध्यक्ष सैय्यद नासीर यांनी निवेदन देऊन मागण्या केल्या आहेत यावेळी सैय्यद ज़मीर जे के , नासिर शाह , महमूद खान पठान , अहतेशाम पठान , रियाज़ मालिक , सैय्यद अंसार अली आदि कार्यकर्ता उपस्तिथ होते .