निज़ाम साजिद
अकोला –भारतीय रेल्वेने आतापर्यंत अनेक अपघात केलेले आहेत त्यामुळे देशातील रेल्वे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण असते रेल्वे गाडी ला अपघात होतात असे गृहीत धरूनच प्रवासी प्रवास करीत असतात त्याच मालिकेत अकोला रेल्वे स्टेशन वरील अपघात ची एक कडी जोडली गेली असती मात्र रेल्वे प्रवाश्यांच्या सुदैवाने पोलीस उप निरीक्षक सैनी हे गस्ती वर असतांनाच त्यांना अकोला रेल्वे स्टेशन च्या फलाट नं 2 वरील रेल्वे रुळाला तडे गेले असल्याचे दिसून आले आणि त्याच काही मिनिटात भरधाव रेल्वे गाडी स्टेशनवर येणार असल्याचे पाहून पोलीस उप निरीक्षक सैनी यांनी तत्परता दाखवत आलेली गाडी दूरवरच थांबवित रेल्वे प्रवासी यांची सुरक्षा केली आणि होणारा रेल्वे अपघात टाळला.
आज सकाळी 6 वाजून 30 मिनिटा ची वेळ असतांना फलाट क्र 2 वर पार्सल विभागाचे बाजूची फलाट ची बाजू ची रेल्वे पटरी तुटलेल्या अवस्थेत दिसून आली याची सूचना तैनात असलेल्या उप स्टेशन अधीक्षक पी डब्ल्यू चाबरा,अकोला डी एस सी आर /बी एस एल यांना देण्यात आली रेल्वे गाडी क्रं 12809 ही 6 वाजून 42 मिनिटांनी अकोला रेल्वेस्थानकमध्ये फलाट क्र 2 येत होती त्यामुळे मोठा अपघात होऊ नये यासाठी कुली निखिल बिल्ला नं 6 यांच्या मदतीने गाडीला लाल झेंडी दाखविण्यात आली त्यामुळे गाडी सुरक्षित अंतरावरच थांबली त्याकाळात युद्धपातळीवर रेल्वे रुळाचे काम करून सकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी गाडी क्र 12809 ही पुढील प्रवासासाठी रवाना झाली त्यानंतर अकोला रेल्वेच्या पोलीस उप निरीक्षक सैनी आणि कुली निखिल आणि स्टेशन उप अधीक्षक यांच्या कार्यतत्पर तेने होणारा अपघात टाळणे शक्य झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.