निज़ाम साजिद
अकोला- अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निर्देशानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ॲड. परवेज डोकालीया हे होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण वैशाली ठग, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे प्रकाश अंधारे , शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जी.ई. लांजुळकर, अल्पसंख्याक समितीचे अशासकीय सदस्य अजिजुन्निसा अब्दुल फारूक अबुल नईम मो. इसाफ , नौशाद खान समद खान , शैरोद्दीन शेख जियाद्दीन , अब्रार खॉ शमशेर खॉ, शेख एजाज शेख हसन मो. अतिक-ऊर- रहेमान, शहजाद अनवर, मो. उस्मान, रीची पी कोहली, गोल्डी ओबेरॉय, डॉ. नझ्र शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
धर्म व भाषा यावर आधारीत अल्पसंख्याक समाज आहे. धर्म व भाषेनुसार यात भेदाभेद न करता सर्वांनी एकसंघ होवून कार्यरत राहावे. देशात अखंडीतता राखण्यासाठी परंपरा , संस्कृती, भाषा व धर्म एका समुदायाने दुस-या समुदायावर लादु नये. घटना व कायादयानुसार प्रत्येकाला आपला हक्क दिलेला आहे. प्रत्येकाला स्वातंत्र आहे असे ॲड परवेज यांनी वेगवेगळे उदाहरण देवून उपस्थितांना समजावून सांगितले.
मौलाना आझाद अल्प संख्याक विकास महामंडळ हे शहरात मुख्य भागात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असावे असे मत सर्वांचे पडले. अल्पसंख्याक समुदयासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनाची माहिती सर्वांपर्यत पोहचली पाहिजे तसेच या योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदयाला मिळाला पाहिजे अशी चर्चा यावेळी झाली. मदरसा मधुन धार्मिक शिक्षणासोबत शासनाने नेमुन दिलेले इतरही शिक्षण झाले पाहिजे त्यामुळे मदरसा मधुन शिक्षण घेवून आलेला विदयार्थी बाहेरील वातावरणात व स्पर्धेत टिकला पाहिजे. असे मत या चर्चासत्रातुन व्यक्त करण्यात आले.
अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी अल्पसंख्यांक कक्षाच्या स्नेहल बोरसेसह प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.