नांदेडमध्ये जिल्हा परिषद शिक्षकाची विष पिऊन आत्महत्या

0 3
धर्माबाद शहरातील शंगरगंज येथील शिक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण दासरवाड (रा. राजापूर, ता.धर्माबाद) हे धर्माबाद
तालुक्यातील शेळगाव(थ) येथील जि.प.शाळेत कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वीच ते घराबाहेर गेले. मात्र त्यानंतर ते परत घरी आलेच नाहीत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शाळेतील ध्वजारोहणालाही ते उपस्थित नव्हते, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भागवात जायभागे घटनास्थळी गेले. घटनास्थळावर त्यांना मृतदेह सूजलेल्या स्थितीत आढळला. मृतदेहासोबत पेन, डायरी, विषारी बॉटल आणि चिठ्ठी आढळून आली.

चिठ्ठीमध्ये आणि हातावर कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचे वडिल लक्ष्मण दासरवाड यांनी मंगळवारी तक्रार दिली. या तक्रारीवरुन धर्माबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शिक्षकाच्या पश्चात पत्नी, १ मुलगा (वय ९ ), १ मुलगी (वय ६) असा परिवार आहे. पोलीस निरिक्षक जायभागे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कदम पुढील तपास करत आहेत.