गुरुद्वारा गेट नं. 1 परिसरातील एका दुकानात बेकायदेशीररित्या शस्त्र विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस उपनिरीक्षक किरण पठारे यांनी छापा मारला. या ठिकाणी सतपालसिंघ जसवंतसिंघ रॉय हा शस्त्र विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ३९ शस्त्र जप्त केले. तसेच सतपालसिंघ याला ताब्यात घेतले आहे.