सातारा | सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्सिंग केले, हे न पाहता त्याला भारतरत्न दिला जातो. पण ऑलंपिकमध्ये अनवाणी जाऊन देशाची मान ताठ करणाऱ्या खाशाबा जाधव यांची पद्मभूषण का नाही दिला जात नाही, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.खाशाबा जाधव तेंडूलकरपेक्षा तसूभरसुध्दा कमी नव्हते. खेड्यातील होते म्हणून त्यांना का दुर्लक्षित केले, असा सामान्याच्या मनामध्ये प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.दरम्यान, पेट्रोल पंपावर तेल भरणाऱ्या धीरूभाऊ अंबानींना केंद्र सरकार पद्मश्री देते. सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळावा, यासाठी मागण्यांचा रेटा उभा राहतो. पण ऑलंपिकमध्ये अनवाणी जाऊन देशाची मान ताठ करणाऱ्या खाशाबा जाधवला का नाही? असं ते म्हणाले.