निज़ाम साजिद
अकोला –महानगरपालिका मध्ये इमानदार व कर्तव्यदक्ष अधिकारी नको आहेत त्यांना येथील सत्ताधारी सळो की पळो करून सोडतात त्यातच सत्ताधारी भाजपा मध्ये 2 गट कार्यरत आहेत दोन्ही गटाचे वरिष्ठ पातळीवर चांगले संबंध आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवर राजकारणी अकोल्यात लक्ष देत नाहीत त्याचे नुकसान अकोल्यातील जनतेला सहन करावे लागते यापूर्वी चे आयुक्तांना भाजपचे सत्ताधारी यांनी पिटाळून लावले आहे कायद्याच्या चौकटीत बसणारे कार्य येथील सत्ताधारी यांना नको असते त्यातच सत्ताधारी यांची मर्जी राखण्यासाठी आयुक्त प्रयत्न करीत असतानाच दुसरा गट नाराज होतो आणि त्या अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करून आपल्या राजकीय वजन दाखविण्याचे शक्ती प्रदर्शन केले जात असते त्याचमुळे अकोला मनपाच्या अनेक वरिष्ठ अधिकारी पद रिक्त आहेत त्या जागेवर मंत्रालयातील अधिकारी येण्यासाठी उत्सुक नसतात तर मंत्रालयातुन अकोल्यात अधिकारी अकोल्यात आणण्यासाठी भाजप चा एकही गट प्रयत्न करीत नाही आणि प्रयत्न केले तरी त्याला यश येत नाही त्यामुळे अकोल्यातील नागरिक कायम अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत मागील महिन्यात मनपा चे विरोधी पक्षनेते साजीद खान पठाण यांची गैरकायदेशीर पणे पदावरून हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दीर्घ काळ सुटीवर जाऊन आपली बदली करून घेण्यात यशस्वी झाले त्यानंतर वाशीम जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी पदावर कार्यरत संजय कापडणीस यांची अकोला महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे हे कापडणीस अकोल्यात किती दिवस आयुक्त राहतील याकडेच जनतेचे लक्ष लागून आहे