औरंगाबाद: 16 आँक्टोबर . शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात संत तुकाराम यांच्यानंतर मुस्लिम समाजाचे मोहंमद पैगंबर (स.अ.व.स.) यांचे काल्पनिक चित्र आदर्श गोष्टी पुस्तकात केल्याने मुस्लिम समाजात संताप व्यक्त केले जात आहे.लेखकाला आदर्श गोष्टी च्या माध्यमातून मोहंमद (स.अ.व.स.) पैगंबरांच्या जीवनावर आधारित आदर्श देण्याचा उद्देश होता पण मोहंमद (स.अ.व.स.) पैगंबरांचे कोठेही छायाचित्र उपलब्ध नसताना काल्पनिक छायाचित्राची गरज काय ? अशा प्रकारच्या अनेक चूका सरकारी पुस्तकात करुन महापुरुषांचा अपमान केला जात आहे. राज्य शासनाच्या या कृतीमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्या चित्रकाराने हे चित्र काढले आहे त्याचे विरुद्ध, मुद्रकाचे विरुद्ध, प्रकाशकाचे विरुद्ध, वितरकाचे विरुद्ध तात्काळ कलम 295 भारतीय दंड विधान अन्वय गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पुढे येत आहे.अगोदर संत तुकारामांचा अपमान करण्यात आला. आता मोहंमद (स.अ.व.स.) पैगबरांच्या सन्मानात संदेशाच्या नावावर चूक केल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, वितरीत करण्यात आलेल्या सर्व पुस्तकांना परत घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी चे प्रवक्ते उमर कमाल फारुकी यांनी केली आहे. समाजाशी झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी नाही तर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे