हदगाव तालुक्यात स्क्रब टाइफसचे २ संशयीत रुग्ण, परिसरात भीतीचे वातावरण

0 4
स्क्रब टाइफसच्या संशयीत रुग्णांच्या रक्ताचा अहवाल अद्याप आलेला नाही. या रुग्णांना ताप आल्यामुळे तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. त्यांची लक्षणे पाहून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. विदर्भात थैमान घातलेल्या स्क्रब टाइफसचे आता नांदेड जिल्ह्यातही २ संशयीत रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
News by marathi.eenadu