अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा घातक, कॅन्सरचा धोका!

0 5

अगरबत्तीचा वापर हा जास्तकरुन पूजा पाठ आणि धार्मिक कार्यांवेळी केला जातो. आध्यात्मिक रुपाने अगरबत्तीला शांती आणि शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं. अगरबत्तीमधून निघणाऱ्या धुराचा सुगंध अनेकांना आवडतो, पण हा धूर एखाद्याचा जीवही घेऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा अधिक घातक असतो. याने कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.

हा अभ्यास साऊथ चीनच्या यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि चीनच्या चायना टबॅको ग्वांगडंग इंडस रेल्वे कंपनीने मिळून केला. या अभ्यासात सिगारेट आणि अगरबत्तीच्या धुरापासून होणाऱ्या नुकसानाचा तुलनात्मक अभ्सास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान अगरबत्तीच्या धुराच्या सॅम्पलमधून आढळून आले की, ९९ टक्के अल्ट्राफाइन आणि फाइन पार्टिकल्स असतात. हे शरीरात गेल्यास याचा वाईट प्रभाव होतो.

चीनमध्ये झाला अभ्यास

चीनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, अगरबत्ती लावल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरासोबत काही बारीक कणही निघतात. हे कण हवेमध्ये मिसळतात. अगरबत्तींमधून निघणारे विषारी कण शरीरातील पेशींवर वाईट प्रभाव करतात.

कॅन्सरचा धोका

अभ्यासानुसार, अगरबत्तीच्या धुरामध्ये तीन प्रकारचे विशेष तत्व असतात जे कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरु शकतात. हे विषारी तत्व म्यूटाजेनिक, जीनोटॉक्सिक आणि सायटोटॉक्सिक या नावांनी ओळखले जातात.

अगरबत्तीमधून निघणारा धूर हा आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. याने आपल्या फुफ्फुसामध्ये जळजळ, उत्तेजना आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकार निर्माण करतो. अगरबत्तीच्या धुराने श्वासनलिकेत खाज आणि जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते.

बारीक कण

अगरबत्तीच्या धुरामध्ये असलेले बारीक कण मानवी शरीरासाठी फारच घातल आहे. अगरबत्तीमध्ये असलेल्या आर्टिफिशिअल किंवा कृत्रिम सुंगध याच्या तत्वांना अधिक घातक करतात.

डोळ्यांसाठी हानिकारक

धुरामध्ये असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे डोळ्यांमध्ये खाज, जळजळ आणि स्कीन अॅलर्जीसारख्या समस्या होऊ शकतात. या धुराने डोळ्यांची दृष्टीही कमी होण्याचा धोका असतो.

News by lokmat.com