मुलीचा बुरखा घातलेला फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल झाला ए. आर. रेहमान, आता शेअर केला हा फोटो

संगीतकार ए. आर. रेहमानने दोन दिवसांपूर्वी निता अंबानींसोबत त्याच्या पत्नी आणि मुलींचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्या मुलीने बुरखा परिधान केला होता. या फोटोमुळे ए. आर. रेहमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रेहमानने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोटो शेअर केला होता. निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला खतिजा, रहीमा आणि सायरा फ्रिडम टू चूज असा हॅशटॅगही त्याने पोस्ट केला आहे. या फोटोत खतिजाने बुरखा घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रेहमानला ट्रोल केले आहे.त्यानंतर आता रेहमानने सोशल मीडियावर आणखीन एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोतून रेहमानने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की खतिजाने बुरखा परिधान करणे किंवा नाही हे तिचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र या फोटोमुळे पुन्हा रेहमान सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. मात्र खतिजाने यावर आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की, मला बुरखा घालण्यासाठी कोणी जबरदस्ती केलेली नाही. मी बुरखा परिधान करते कारण मला आवडते. मी अॅडल्ट आहे त्यामुळे मला माहित आहे काय परिधान करायचे आणि काय नाही.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading