महानगरपालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने  स्थापन केली राज्यस्तरीय विशेष समिती अकोल्यातून सैय्यद युसुफ अली यांचा समावेश

निज़ाम साजिद

अकोला-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी राज्यातील 18 महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्न, समस्या सोडविण्याच्या दृष्टीने व पक्षबांधणीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण (पुणे) यांची तर उपाध्यक्षपदी आमदार विद्याताई चव्हाण (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्यातून समितीवर सदस्यपदी सैय्यद युसुफ अली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव या पदावर कार्यरत असलेले सैय्यद युसुफ अली यांच्याकडे यापूर्वी पक्षाने यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय विशेष समितीवर नियुक्ती झाल्याने अकोला महानगरपालिका क्षेत्राची जबाबदारीही युसुफ अली यांच्यावर पक्षाने सोपविली आहे. सैय्यद युसुफ अली हे अकोला महानगर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असतांनाच पक्षाने महानगरपालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून काँग्रेसशी युती करून सत्ता मिळविली होती. सैय्यद युसुफ अली यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांची राज्यस्तरीय समितीवर नियुक्ती केली आहे.

विदर्भातून या समितीवर माजी आमदार सुलभाताई खोडके, दुनेश्वर प्रसाद पेठे व सैय्यद युसुफ अली या तिघांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. सैय्यद युसुफ अली यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री फौजिया खान, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रीय प्रवक्ता नवाब मलिक, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक, नसिम सिध्दीकी, निरीक्षक बसवराज पाटील, प्रविण कुंटे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आ. तुकाराम बिरकड, प्रदेश प्रवक्ता डॉ. आशाताई मिरगे, प्रदेश सचिव प्रा. विश्वनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, विजय देशमुख, श्रीकांत पाटील पिसे, श्यामबाबू अवस्थी, शहर अध्यक्ष राजू मुलचंदानी, मंदाताई देशमुख, विजय उजवणे, गजानन इंगळे, अजय तापडीया यांना देतात.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading