नांदेड(प्रतिनिधी)दि.12ः- मराठवाडयातील जनतेसाठी दिनांक 19 मार्च मंगळवार पासून नांदेड निजामुद्दीन (नवी दिल्ली) दरम्यान मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस नवीन साप्ताहिक कायमस्वरूपी अति जलद रेल्वेची घोषणा रेल्वे विभागाने केली असून ही गाडी परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणार आहे.
यासंदर्भात रेल्वेने जाहिर केलेल्या वेळापत्रकात गाडी क्र. 12753 नांदेड-निजामुद्दीन एक्सप्रेस दर मंगळवारी नांदेड येथून सकाळी 8 वाजता निघून परभणी 9.10, जालना 11.10, औरंगाबाद दुपारी 12.15, मनमाड 3.20, जलगांव, भुसावळ, भोपाळ, झांसी, आग्रा कॅन्ट स्थानकावरुन अखेर दिल्ली येथे दर बुधवारी दुपारी 1 वाजता पोहोचणार आहे परतीत गाडी क्र. 12754 निजामुद्दीन येथून दर बुधवारी संध्याकाळी 7.50 ला निघून वरील मार्गाने मनमाड येथे दर गुरुवारी सायंकाळी 5.15, औरंगाबाद संध्याकाळी 7.25, जालना रात्री 8.20, परभणी 11.05 आणि अखेर नांदेड येथे दर शुक्रवारी प्रातः 1 वाजता पोहोचणार आहे. सदर रेल्वेत 1 सेकेंड एसी, 2 थर्ड एसी, 6 स्लीपर, 4 जनरल आणि 2 महिला गार्ड सहित एकूण 15 डब्यांची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
सदर रेल्वेत आणखी 5 अतिरिक्त डब्बे जोडून किमान 20 डब्यांची सुविधा देण्यात यावी आणि या गाडीला दररोज चालविण्यात यावे. तसेच अकोला मार्गावरील नांदेड-निजामुद्दीन, नांदेड-जम्मूतवी, हैदराबाद-जयपूर या तीनही विशेष रेल्वे गाड्यांना कायम करण्यात यावे आणि मनमाड मार्गे नवीन नांदेड-बिकानेर, अकोला मार्गे औरंगाबाद-नागपूर आणि नागपूर/औरंगाबाद-गोवा साठी नवीन उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, राकेश भट्ट, रितेश जैन, डॉ राजगोपाल कालानी, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमित कासलीवाल, संभानाथ काळे, प्रवीण थानवी, फिरोज आली, रियाज सैयद अली, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित इत्यादींनी केली आहे