अकोल्यात तेलीपुरा परिसरातील इमारत धाराशायी; चार जखमी कल्पना चोपडे यांचा मृत्यु

अकोल्यात तेलीपुरा परिसरातील जीर्ण तिन मजली इमारत धाराशायी. चार जखमींना बांहेर काढण्यात यश. कल्पना चोपडे यांचा मृत्यु . घटनास्थळावर पोलिस प्रशासन,मनपा कर्मचारी तैनात

नि़जाम साजिद

अकोला-शहराच्या बाजारपेठ परिसरात तेलीपुरा चौकातील सुभाष रोड आणि तेलीपुरा चौक या रस्त्यावर जानकीराम चोपडे यांची तिन मजली इमारत रात्री ९-०० च्या सुमारास अचानक पत्याप्रमाणे कोसळून जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच धावपळ पहावयास मिळाली.दरम्यान शहरात वा-यासारखी हि घटना पसरल्याने ह्या ठिकाणी एकच हल्लाकोळ उठला होता.परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात सदर रस्त्यावरील वाहतुक बंद करून बॅरीकेट लावले.

प्राप्त माहितीनुसार तेलीपुरा चौकामध्ये जानकी रामजी चोपडे यांचे कुटुंबीय वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी कल्पना ताई चोपडे त्यांचा मोठा मुलगा मंगेश चोपडे यांची पत्नी सुनीता चोपडे व लहान भाऊ योगेश चोपडे हे रहिवासी होते.मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान जानकीराम चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसलेले असताना त्यांची तिन मजली असलेली इमारत अचानक कोसळली विटा आणि सिमेंटच्या साहित्यामध्ये बांधलेली ही इमारत जीर्ण झाल्यामुळे कोसळली सुरूवातीला इमारतीच्या ढिगायाखाली कल्पना चोपडे यांच्यासह पूर्णपणे कुटुंबीय होते.पोलीस अधिकारी कर्मचारी आणि महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचा-यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले त्यामुळे जानकीराम चोपडे,मंगेश चोपडे त्यांच्या पत्नी सुनीता चोपडे मंगेशचा लहान भाऊ योगेश चोपडे यांना ढिगा-याखालून बाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर जानकीराम चोपडे यांच्या पत्नी कल्पना चोपडे ह्या ढिगा-याखाली दबून महिलांचा मुत्यु झाला.3,4 तासांपासून त्यांना बाहेर काढण्याचे कार्य मोठ्या ताकदीने सुरू होते.या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख ठाणेदार शेख ठाणेदार विलास पाटील ठाणेदार ठाणेदार सपकाळ सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील खदान पो.स्टे चे ठाणेदार अनिल जुमुळे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी घटनास्थळ गाठून जखमींवर उपचार केले यासोबतच परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली काही वेळातच महापालिकेची जेसीबी घटनास्थळावर बोलावण्यात आली.मात्र कोसळलेली इमारत मोठ्या इमारतींच्या आत मध्ये असल्याने सदर जागेवर जेसीबीने प्रचंड अडचण निर्माण झाली होती.त्यामुळे उचलण्याचे काम शेवटी उपस्थित लोकांकडूनच करण्यात आले यामध्ये प्रचंड वेळ गेल्याने कल्पना चोपडे यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर उशिरा आली .

*मनपाच्या कर्मचा-यांची बेपवाई*

रात्री ९-०० वाजताच्या सुमारास तेलीपुरा परिसरातील इमारत जमिनदोस्त होत असतांना येथील ढिगारा दुर करण्यासाठी जेसीबी मशीन ची नितांत गरज असतांना मनपा ची जेसीबी मशिन घटनास्थळावर येण्यास तब्बल २तास लागले. परीसरातील नागरिकांनी मलबा दुर करून जखमींना तर बाहेर काढले परंतु कल्पना चोपडे नामक अद्यापही ढिगा-यात असल्याने जेसीबी लवकर आणली असती तर सर्व जखमींना तातडीने बाहेर काढता आले असते.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading