जेव्हा शाहरूख खान म्हणतो, गौरी बुरखा घाल अन् नमाज सुरू कर…!

शाहरूख खान आणि गौरी खान बॉलिवूडच्या हॅपी कपल्सपैकी एक आहेत. शाहरूख व गौरीच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत आणि आजही त्यांच्यातील प्रेम कायम आहे. अलीकडे शाहरूख फरीदा जलालच्या टॉक शोमध्ये सहभागी झाला. या शोमध्ये शाहरूख गौरीवर भरभरून बोलला. गौरी व त्याच्या लग्नातील एक मजेशीर किस्साही त्याने शेअर केला. हा किस्सा आहे, गौरी व शाहरूखच्या रिसेप्शनचा. शाहरूखने तो भलताच रंगवून सांगितला. त्याने सांगितले की, ‘आमच्या रिसेप्शनला गौरीचे अनेक नातेवाईक हजर होते. गौरीचा पती मुस्लिम आहे, हे ऐकून त्यांची कुजबूज सुरू होती. मुलगा मुस्लिम आहे, मग गौरी नाव बदलणार का, मुस्लिम धर्म स्विकारणार का? अशा पंजाबीत त्यांच्या गप्पा सुरू होत्या. त्यांच्या त्या मजेशीर गोष्टी ऐकून मलाही सगळ्यांची थोडी फिरकी घेण्याचे मूड झाले. मी गौरीकडे पाहून जरा मोठ्या आवाजात बोलायला लागलो. गौरी,चल तुझा बुरखा घाल आणि नमाज सुरू कर..’ माझे हे वाक्य ऐकून सगळेच गौरीकडे टकमक पाहू लागले. ते पाहून मला आणखीच तेव चढला. आजपासून गौरी कायम बुरखा घालेल. ती घराबाहेर निघणार नाही आणि आजपासून तिचे नाव आयशा असेल, असेही मी म्हणालो. माझे ते शब्द ऐकून सगळेच गार पडलेत. ते सगळेच मजेशीर होते. आजही आम्ही तो क्षण आठवतो तेव्हा हसून हसून आमचे पोट दुखते. यावरून एक शिकवणही मिळते. ती म्हणजे, सर्वांनाच सर्वांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. प्रेमाच्या आड कुठलाही धर्म यायला नको.

news by lokmat.com

Leave a comment