नांदेड ः प्रतिनिधी.नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी मागील 20-25 वर्षांपासून पाहिलेले छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्याचे स्वप्न आता वास्तवात उतरणार असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी छ.राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ.शिलाताई भवरे यांनी येथे दिली.
याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळा उभारणीचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची परिपूर्ती एक वर्षाच्या आत होत असल्याचा आपणांस आनंद होत आहे, असे सांगतानाच हा पुतळा उभारणीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पालकमंत्री आ.डी.पी.सावंत यांच्या अथक प्रयत्नांतून 2013 मध्ये कृषी विद्यापीठाच्या जागेचे हस्तांतरण महानगरपालिकेकडे करण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये या पुतळ्याच्या भूमिपुजनाचा सोहळा संपन्न झाला. मागील 20 ते 25 वर्षांपासून जिल्ह्यातील विविध समाजांंची या पुतळ्याविषयीची मागणी होती.
पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून या पुतळ्याच्या अनावरणासाठी कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतीत काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान आ.डी.पी.सावंत यांनी कोल्हापूर येथे माजी मंत्री आ.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित करण्याविषयी चर्चाही केली होती.
यासंदर्भात महापालिकेतर्फे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना रितसर निमंत्रण देण्यासाठी माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कोल्हापूर येथे लवकरच जाणार असून त्यांना पुतळा अनावरणासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी दिलेल्या वेळेनुसार लवकरच हा अनावरणाचा सोहळा संपन्न होईल, त्यानंतर छत्रपती शाहु महाराज यांचा पुतळा सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या या पुतळ्याचे व परिसर सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील एक महिन्याच्या आत हा सोहळा संपन्न होण्याची अपेक्षा असल्याचे महापौर शिलाताई भवरे यांनी आज येथे सांगित