भाजप कार्यकर्त्यांसाठी रविवारी प्रशिक्षण वर्ग!

नांदेड (प्रतिनिधी) :  भारतीय जनता पार्टी महानगर नांदेडच्यावतीने पं दीनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजने अंतर्गत नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी रविवारी (दि.7) सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर हे करणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड महानगर भाजपचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे हे राहणार आहेत.या प्रशिक्षण वर्गात वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासू वक्त्यांची भाषणे होणार आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष श्री भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, ज्येष्ठ नेते डॉ. धनाजीराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, माजी खा. श्री डी.बी. पाटील तसेच व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री दिलीप कंदकुर्ते, प्रदेश प्रवक्ता प्रा. सुनील नेरलकर, डॉक्टर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. चैतन्यबापू देशमुख,प्रदेश सदस्य तथा भाजयुमो प्रदेश प्रभारी श्री संजय कौडगे व नांदेड मनपातील विरोधी पक्षनेत्या सौ. गुरूप्रितकौर दिलीपसिंघ सोडी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दि. 7 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट, नांदेड येथे हे प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. सकाळी 11.15 वाजता केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती आ. राम पाटील रातोळीकर आपल्या उद्घाटनपर भाषणात देणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता ‘जनसंघ ते भाजपा’ या विषयावर प्रा. नंदु कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 12.45 वाजता ‘बुथ निवडणूक पूर्वतयारी’ या विषयावर श्री रामराव केंद्रे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. मध्यंतरानंतर दुपारी 1.45 वाजता ‘निवडणुकीतील प्रचार व प्रसार’ या विषयावर नांदेड उत्तर विधानसभेचे प्रभारी श्री प्रवीण साले यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर दुपारी 2.30 वाजता ‘आपला परिवार’ या विषयावर श्री सनतकुमार महाजन कार्यकर्त्यांना संबोधित करतील व ‘सध्याची राजकीय परिस्थिती’ या विषयासह समारोपाचे भाषण ज्येष्ठ नेते डॉ. धनाजीराव देशमुख हे करणार आहेत.या प्रशिक्षण वर्गाला भाजपचे सर्व बुथप्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख,मंडळ अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चा,अनु जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा,अनु जमाती मोर्चा ,अल्पसंख्यक मोर्चा,किसान मोर्चा,व्यापारी मोर्चा,उद्योग आघाडी,सहकार आघाडी,विधी आघाडी सह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी व माजी नगरसेवक,जि प सदस्य, पं स सदस्य, सरपंच यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रशिक्षण विभाग संयोजक तथा भाजपा महानगर चिटणीस बालाजी पाटील शेळगावकर तसेच प्रशिक्षण विभाग समिती सदस्य शंकर मनाळकर, चंचलसिंघ जट, धिरज स्वामी, अंबादास जोशी, प्रभू कपाटे, विश्वांभर शिंदे, दिपक यादव, सौ. शततारका पांढरे, कामाजी कदम, संतोष कदम जानापुरीकर, सिद्धार्थ धुतराज, अनिलसिंह हजारी, रमेश धात्रक यांनी केले आहे.
Leave a comment