नांदेड:8 oct:मुदखेड-नांदेड-परभणी दुहेरीकरणाचे काम प्रगति पथावर आहे. यातील परभणी ते मिरखेल हा 17 किलो मीटर चा मार्ग गेल्या वर्षीच सुरू करण्यात आला आहे. यातील लिंबगाव ते मुगट दरम्यान सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरक्षा आयुक्त , दक्षिण विभाग यांनी या मार्गावर रेल्वे गाडी चालवणे योग्य आहे का त्या दृष्टीने पाहणी केली. या पैकी मुदखेड ते मुगट दरम्यान नोन-इंटर लॉक वर्किंग,४ ते ९ ऑक्टोबर दरम्यान चालू आहे. या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणून लिंबगाव ते मालटेकडी स्थानका दरम्यान सिग्नलिंग ची व्यवस्था करण्या करिता आणि मुगट – नांदेड-लिंबागाव दरम्यान दुहेरी पटरी चा वापर करता यावा म्हणून जे कार्य करणे आवश्यक आहे त्या करिता ८ दिवसांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. यात 04 दिवस नोन-इंटर लॉक वर्किंग पूर्वी आणि 04 दिवस नोन-इंटर लॉक वर्किंग करिता असा 08 दिवस हा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येत आहे.
दिनांक 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान नोन-इंटर लॉक वर्किंग पूर्वी आणि दिनांक 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान नोन-इंटर लॉक वर्किंग पूर्वी आणि 4 दिवस नोन-इंटर लॉक वर्किंग करिता असा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मुळे काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द, काही गाड्या मार्ग बदलून तर काही गाडी उशिरा धावणार आहेत.
त्या गाड्यांची यादी आणि दिनांक इत्यादि सोबत जोडले आहे.तसेच या गाड्यांची यादी दक्षिण मध्य रेल्वे च्या अधिकृत वेब साईट वर हि उपलब्ध आहे आणि नांदेड रेल्वे डिविजन च्या फेसबुक पेज वर पण उपलब्ध आहे. हे कार्य लिंबगाव ते मुगट दरम्यान दुहेरीकरणा करीत करत आहोत.
प्रवाश्यांना होणार्या असुविधे करिता रेल्वे प्रशासन दिलगीर आहे