नांदेड जिल्‍हा परिषदेचे शिक्षक पुरस्‍कार लांबणीवर

0 5

नांदेड, 26- जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने देगलूर येथे दिनांक 29 सप्‍टेंबर रोजी आयोजित केलेला जिल्‍हा शिक्षक पुरस्‍कार सोहळा लांबणीवर टाकण्‍यात आल्‍याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व माध्‍यमिकचे शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांनी आज दिली.    जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने प्राथमिक व माध्‍यमिक विभागात उत्‍कृष्‍ट काम करणा-या शिक्षकांना जिल्‍हा शिक्षक पुरस्‍कार देवून गौरविण्‍यात येते. सन 2018-19 या वर्षासाठी जिल्‍हयातील 20 शिक्षकांची निवड करण्‍यात आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा सोहळा लांबणीवर टाकण्‍यात आला असून पुढील तारीख लवकरच कळविण्‍यात येईल असे प्रशासनाच्‍यावतीने सांगण्‍यात आले.