जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मरची मागणी केली जात आहे. तसेच थ्रीफेजचे ८९५ तर सिंगल फेजचे २२५ असे एकूण १ हजार १२० ट्रान्सफार्मर जळाले आहेत. यामुळे जिल्ह्यात अनेक नागरिकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. तोडगा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ट्रान्सफार्मरबाबत निधीची मागणी केली होती. ऊर्जामंत्र्याच्या मागणीनुसार खासदार चव्हाण यांनीही बैठकीतूनच पालकमंत्री रामदास कदम यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. विनंतीनुसार पालकमंत्र्यांनी महावितरण ट्रांसफार्मर खरेदीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यापैकी ४ कोटी रुपये तातडीने देण्यात येणार असून उर्वरित एक कोटी रुपये देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.