भाजप आमदारावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली, पोलिसांना अश्रू अनावर

पुणे | भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलिसांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.  कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. योगेश टिळेकर यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन काही तास उलटत नाहीत तोच मिलिंद गायकवाड यांच्या बदलीचा आदेश निघाला. गायकवाड यांनी निरोप घेताना त्यांचे सहकारी ढसाढसा रडताना पहायला मिळाले.  दरम्यान, मिलिंद गायकवाड यांच्या बदलीमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मनसे आता आक्रमक झाली असून उद्या मोर्चा देखील काढणार आहे.

Leave a comment