ऍड.मुमताजअली कादरी श्रद्धांजली सभेचे 16 ऑक्टोबर रोजी आयोजन

0 19
नांदेड/प्रतिनिधी-नांदेड येथील प्रख्यात विधिज्ञ ऍड.मुमताजअली कादरी यांचे हज यात्रे दरम्यान नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मक्का येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व पक्ष संघटनांच्यावतीने आज मंगळवार दि.16 रोजी हॉटेल अतिथी येथे सायंकाळी 6.30 वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत ऍड.मुमताजअली कादरी यांचे विविध पक्ष, संघटना व त्यात काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा घनिष्ठ संबंध होता. संकट काळात धावुन येणारा मित्र अशी त्यांची मित्र परिवारात ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना जबर धक्का बसला. त्यांना भावपूर्णं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवार दि.16 ऑक्टोबर रोजी हॉटेल अतिथी येथे सायंकाळी 6.30 वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध पक्ष, संघटनांतील ऍड.मुमताजअली कादरी यांच्या मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युएसएफचे अध्यक्ष अल्ताफ हुसेन, कॉ.प्रदीप नागापूरकर, सुराज्य सेनेचे फारुख अहेमद, उद्योजक अ.वहीदसेठ, डॉ.श्याम तेलंग, माजी उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, ऍड.अब्दुल बारी सिद्दीकी, अ.भा.क्षत्रीय महासभेचे मराठवाडा अध्यक्ष पवनसिंह बैस, हाजी मुस्ताक शरिफ, मौ.आजीम रिज्वी, मौ.आसीफ नदवी, इंजि.अ.हाकीम, बालाजी थोटवे, इंजि.नसीर हाश्मी, इंजि.जावेद लुतफुल्ला, प्रा.एम.ए.बसीर, प्रा.मझहर हुसेन, ऍड.श्रीधर कांबळे, ऍड.सुरेंद्रसिंघ लोणीवाले, ऍड.इम्रानखान, ऍड.राम कानोटे आदींनी केले आहे