जांब बू. येथील कोंडाबाई तुकाराम पोद्दार यांचा वृद्धापकालाने मृत्यू झाला होता. आज त्यांचा अंत्यविधी करण्यात झाला. त्यांच्या अंत्यविधिसाठी विशाल सुरेशराव सावळकर (वय-३२ रा.आरळी ता.बिलोली, जि.नांदेड), लक्ष्मण दिगंबर कौठकर (वय-३४, रा. होटल ता. देगलूर) आणि दत्ता विठ्ठल दैवज्ञ (वय-१८, रा.जांब, ता.मुखेड) हे तीन युवक अंत्यविधि आटोपून जांब येथील तलावात स्नान करण्यासाठी गेले. मात्र, तलावात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून अंत झाला. तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.