
दुबई.भारत आणि पाकिस्तानचा या दोन देशांमध्ये मालिकाही सुरु व्हावी, भारताबरोबरच्या मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे मत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले आहे.
‘सध्या सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने कोट्यावधी लोकं पाहत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये मालिकाही खेळवली जावी. यासाठी राजकारण बाजूला ठेवायला हवे. कोणत्या एका व्यक्तीपेक्षा खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,’ असे मणी यांनी सांगितले.