.औरंगाबाद.:उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला वगळून समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी होण्याची शक्यता असताना समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काँग्रेसने महाआघाडीसाठी पुढाकार घ्यावा, असे विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर हे एमआयएमला ‘हात’ दाखवून काँग्रेससोबत जातील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.औरंगाबादमध्ये अबू आझमी यांनी महाआघाडीबाबत भाष्य केले. महाराष्ट्रासह देशातही समविचारी, संविधानाला मानणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणे आवश्यक असून, त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. भाजपाचा पराभव करण्यासाठी महाआघाडी गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले.