पालकमंत्री रामदास कदम यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 26 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.सोमवार 29 ऑक्टोंबर 2018 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वा. सन 2018-19 मध्ये पिण्याचे पाणी आरक्षण करण्यासंदर्भात बैठक स्थळ- नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत आमदार हेमंत पाटील यांचे मतदारसंघातील विविध आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सायं 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

اپنی رائے یہاں لکھیں