नांदेड: शाळेत घुसून अल्पवयीन मुलाची शिक्षकाला बेदम मारहाण

नांदेड – शहरातील चिरागगल्ली परिसरातील शारदा शिक्षण भवन हायस्कूलमध्ये एका अल्पवयीन मुलाने शिक्षकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. कोल्हेवाड असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.शारदा भवन हायस्कूलच्या प्रांगणात विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात येते. परंतु, या ठिकाणी बाहेरील काही तरुण मैदानावर येऊन नेहमी गोंधळ घालतात. अनेकवेळा मुलींची छेड काढण्याचे प्रकारही या ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने बाहेरच्या व्यक्तींना शाळेच्या प्रांगणात येण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, शनिवारी परिसरातील एक अल्पवयीन मुलगा शाळेच्या प्रांगणात हुल्लडबाजी करत होता. त्या मुलास शाळेतील शिक्षक वाय. एस. कोल्हेवाड यांनी बाहेर जाण्यास सांगितले असता, त्याचा राग मनात धरून त्याने शिक्षक कोल्हेवाड यांच्याशी वाद घातला आणि हातातील कड्याने त्यांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मारा केला.
या घटनेत शिक्षक कोल्हेवाडी जखमी झाले होते. त्यांच्या नाका-तोंडाला जबर दुखापत झाल्याने शाळेतील इतर शिक्षक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन इतवारा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंद करून पुढील कारवाई केली.

اپنی رائے یہاں لکھیں