नांदेडमधून डॉ. धनाजीराव देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित- राम चौधरी

नांदेड – लोकसभा मतदार संघात भाजपातर्फे डॉ. धनाजीराव देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीद्वारे बोलताना सांगितले.
दि. १३ मार्च २०१९ रोजी नांदेड जिल्ह्यातील १३ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ राम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ना. नितीन गडकरी यांना भेटले होते. जवळपास २० ते ३० मिनिट राम चौधरी यांनी गडकरी यांच्याशी डॉ. धनाजीराव देशमुख हेच विजयासाठी सर्वार्थाने कसे सक्षम उमेदवार आहेत हे पटवून दिले होते. चर्चे दरम्यान गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच काल दि. १३ मार्च १९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी हेच शिष्टमंडळ राम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी जवळपास अर्धा तास शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेतली. नांदेडची जागा जिंकायची असल्यास डॉ. देशमुख यांना उमेदवारी द्या, नसता केवळ जागा लढवायची असेल तर कोणालाही उमेदवारी द्या अशी रोखठोक भूमिका यांनी राम चौधरी यांनी घेतल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांच्या सकारात्मक संकेतामुळे डॉ. धनाजीराव देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित असल्याचे राम चौधरी यांनी सांगितले

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading