नांदेड: दिनांक ५ जानेवारी रोजी नागपूर -मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस मध्ये एक तोतया तिकीट तपासनीस (नाव श्री राजेंद्र मुंडले राहणार -जालना ) प्रवाश्यांचे तिकिटे तपासित होता. त्याच गाडीत ड्युटी वर असलेले श्री छोटूराम मीना, टी टी ई यांनी त्याची विचारपूस केलीआणि तो तोतया असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलिसांना कळविले.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या (जि.आर. पी .) स्वाधीन केले. पुढील तपास जि.आर.पी. औरंगाबाद करत आहेत. मध्य रात्री गुन्हा दाखल झाला आहे. श्री छोटूराम मीना यांना त्याच गाडीत ड्युटी वर असलेले श्री शिवा , श्री रमेश आणि मुकेश चौधरी या इतर तिकीट तपासणीसांनी तसेच औरंगाबाद येथील श्री मोहन. आणि श्री प्रभास उपाध्याय यांनी मदत केली. नांदेड येथील नियंत्रण कक्षातील श्री व्हिन्सेंट यांनी सर्व घटनेत महत्वाचे योगदान दिले आणि पोलिसांना वेळेवर तिथे पोहोचविले.