नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. लोकसभा त्रिशंकू असेल आणि म्हणूनचं त्याचं नेतृत्व नितीन गडकरी करतील, अशी भविष्यवाणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.‘काँग्रेस’शिवाय महाआघाडीला यश मिळणार नाही. भाजपसोबत युती करण्याचा कोणताच विचार आम्ही करत नाही. ते त्यांच्या पक्षांचं काम बघतात आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम बघतो आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. संजय राऊत एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलत होते.