नांदेड:महावितरणच्या वीजचोरी शोधमोहीम पथकावर हल्ला; ७ अधिकारी जखमी

0 4
देगलूर विभागांतर्गत वीजचोरी विरोधात शोधमोहीम सुरू आहे. याअंतर्गत बुधवारी धर्माबाद तालुक्यातील करखेली, रावधानोरा, धानोरावाडी तसेच बाचेगाव या गावामध्ये वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी महावितरणचे शोधमोहीम पथक गेले होते. चोरून वीज वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत असताना बाचेगाव येथे जवळपास ४० ते ५० लोकांनी महावितरणच्या पथकावर हल्ला केला. करखेली शाखा कार्यालयाचे शाखा अभियंता सुमित पांडे, सहाय्यक अभियंता वरेटवार, तसेच एच.एस.मानधरणे, बी.टी.कुकडे, पी. एस.जाधव यांच्यासह पंच म्हणून आलेल्या इतर दोन व्यक्तींनाही मारहाण करण्यात आली.या मोहिमेत २५ वीज चोऱ्या पकडण्यात आल्या असून बाचेगाव येथील मारहाण करणाऱ्या विरोधात धर्माबाद पोलीस ठाण्यात ९ वीज चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.