लोकमान्य तिलक टर्मिनस– निझामाबाद- लोकमान्य तिलक टर्मिनस गाडीचा विस्तार करीम नगर पर्यंत

नांदेड:25 Sep.गाडी संख्या 11205 / 11206 लोकमान्य तिलक टर्मिनस-निझामाबाद-लोकमान्य तिलक टर्मिनस या साप्ताहिक रेल्वे गाडीचा विस्तार करीम नगर  पर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. गाडी दिनांक 29-9 पासून लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई  येथून आणि दिनांक 30-09 पासून करीमनगर येथून बदलेल्या वेळापत्रका नुसार धावेल. रेल्वे राज्य मंत्री या विस्ताराच्या गाडीस सिकंदराबाद येथून विडीओ लिंक द्वारे  हिरवी झेंडी दाखवतील. उद्घाटनाची विशेष गाडी क्र. 01206 कारींमनगर ते निझामाबाद दरम्यान सोबत दिलेल्या वेळे नुसार धावेल. दिनांक 26-09-2018 रोजी दुपारी 15.00 वाजता या गाडीचे उदघाटन सिकंदराबाद येथून करण्यात येयील. हि गाडी दुपारी 15 वाजता सुटेल.निझामाबाद-लोकमान्य तिलक टर्मिनस – निझामाबाद दरम्यान हि गाडी पूर्वीच्या वेळे नुसारच धावेल. यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

 

Leave a comment