नांदेड :कचरा उचलणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या; माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) आठवडी बाजारामध्ये कचरा उचलून घेऊन जावू नका असे सांगत या भागातील माजी नगरसेवकाने एका कचरा गाडीच्या काचा फोडून नुकसान केले या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरातील कचरा उचलण्याचे काम आर ऍन्ड बी इंफ्रा प्रॉजेक्ट कंपनीला मिळाले आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता तरोडा येथे भरणाऱ्या बुधवारच्या आठवडी बाजारात कचरा उचलण्यासाठी यंत्र सामुग्री आणि मनुष्यबळ तैनात होते. त्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास परवाना नगर कॅनाल रोडवर माजी नगरसेवक उमेश मुंडे आणि त्याच्या दोन साथीदाराने आठवडी बाजरातील कचरा उचलण्यास येवू नये म्हणून कामगारांना शिवीगाळ केली त्यावेळी कचरा जमा करण्यासाठी असलेले वाहन क्रमांक एम.एच.26 बी.ई.2168  या वाहनाचे समोरील दोन्ही बाजूचे काम उमेश मुंडे व त्याच्या साथीदाराने फोडले आणि 6 हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत वाहन चालक श्रावण केरबा शिराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक उमेश मुंडे आणि त्यांच्या साथीदारांविरुध्द 427,504  आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Leave a comment