दुसरे लग्न करण्यासाठी आईकडून चिमुरडीचा खुन, माजी आमदारासह ८ जणांवर गुन्हा दाखल

0 14

नांदेड शहरातील सुधा शर्मा यांचा हैदराबाद येथील पवन वर्मा यांच्याशी २१ मे २०१३ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना वैष्णवी नावाची एक मुलगीही झाली. काही दिवसांनी नांदेडला लग्न आहे म्हणून सुधा आपल्या नांदेड येथील माहेरी निघून आली. बरेच दिवस ती परत गेली नाही. मुलगी वैष्णवी ही तिच्या सोबत होती. सुधा हिला दुसरे लग्न करायचे असल्यामुळे आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी वैष्णवीची तब्येत बिघडली असल्याचे कारण पुढे करुन तिचा खून केला. हे प्रकरण दडपण्यासाठी तिला तिचे नातेवाईक, पोलीस, डॉक्टर आणि राजकीय कार्यकर्ता माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची मदत मिळाली, अशी तक्रार पवन वर्मा यांनी न्यायालयामार्फत केली होती. नांदेड न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना सबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात सुधा पवन उर्फ सनी वर्मा, मनोज मिठ्ठूलाल बाफना, ललिता मनोजकुमार बाफना (सर्व रा.दिलीपसिंह कॉलनी, नांदेड), ओमप्रकाश पोकर्णा, पवन जगदीश शर्मा, जयचंद बाफना, डॉक्टर निरामय हॉस्पिटल, पोलीस ठाणे अधिकारी वजीराबाद नांदेड यांच्याविरुद्ध कलम ३००, ३०२, ३०४, ३१७, ३१८, १२०-ब, २०१, १६६, २६९, ३२८ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.