पंढरपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणूकी दरम्यान देशातील सर्वसामान्यांच्या बॅक खात्यात 15 लाख रूपये जमा करू असे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही.त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या 15 लाखांची मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याकडे केली. त्यामुळे त्यांची एकच तारांबळ उडाली.भाजप प्रवक्ते माधव भांडारी हे आज एका खासगी कार्यक्रमासाठी पंढरपूरात आले होते. भंडारी दुपारी येथील विश्रामगृहात थांबल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रिकामी पिशवी घेऊन जात त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.दरम्यान, माझ्याकडे साधे 15 रूपये नाहीत, 15 लाख कुठून असणार, असं म्हणत त्यांनी वेळ मारली.