सातारा | उद्धव ठाकरे म्हणत असतील अजित पवार काकांच्या पुण्याईमुळे मोठे झाले, तर तुम्हीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावरच मोठे झाले आहात, असं राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.तुम्ही कोणाच्या जीवावर मोठे झालात, हे सांगण्यासाठी कोणत्या कुडमुड्याची गरज नाही. तसंच तुमचे स्वत:चे असे काय कतृर्त्व आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.ज्यांनी मुंबईत झालेल्या गटारांच्या कामातही पैसे खाल्ले. त्यांच्याच तोंडून गटाराचीच भाषा येणार, असं प्रत्त्युत्तरही त्यांनी शिवसेनेनं केलेल्या टीकेला दिलं होतं.दरम्यान, अजित पवार हा गटारीतला किडा आहे, मुतऱ्या तोंडाचा आहे, अशी टीका शिवसेनेनं सामना पेपरमधून केली होती.