महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित चलो पंचायत अभियानाचा औरंगाबाद पुर्व विधानसभेमध्ये शुभारंभ

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित चलो पंचायत अभियान या कार्यक्रमाचा आज औरंगाबाद पुर्व विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पुर्व विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माजीद खान यांनी संजयनगर येथे कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी नगरसेवक हबीब कुरेशी यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी बेरोजगार तरुणांचे रोजगार कार्ड भरून घेण्यात आले तसेच या चलो पंचायत अभियानाची माहिती सर्व युवकांना देण्यात आली हे अभियान जवळपास एक महिण्यापासून चालू आहे.
या कार्यक्रमा संबोधित करतांना आमदार सुभाष झांबड यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आणि औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या खासदाराने आजपर्यंत काहीही विकासाची कामे केली आहे. फक्त धर्माचे राजकारण केले. मुजफ्फर खान यांनी चलो वार्ड अभियानाची माहिती देतांना सांगितले कीं संपुर्ण शहरात बेरोजगार फार्म भरण्याचा कार्यक्रम सुरु आहे व काँग्रेसची सत्ता आल्यानंतर बेरोजगारांना भत्ता दिला जाणार आहे. मनिष चौधरी यांनी सांगितले कीं देशात राहुल गांधीजीच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या माध्यमातून किसान कर्ज माफी होणार आहे युवकांना बेरोजगार भत्ता सुरू करण्याचा संकल्प असून आज देशात जनतेत तीव्र नाराजी आहे.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव मनिष चौधरी, आमदार सुभाष झांबड, जिल्हाचे प्रभारी मुख्तदीर देशमुख, प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलीम, प्रदेश महासचिव अकील पटेल, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान, लियाकत पठाण, उमर पठाण यांच्या सह यांच्यासह युवक काँग्रेसचे इतर पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading