भोकर चा भूमिपुत्र आणि ग्रामिण रूग्णालय मुदखेडच्या माजी कर्मचारी शेख अहेमद याने विश्वविक्रम नोंदवून रचला ईतिहास

भोकर येथिल भुमिपूत्र आणि ग्रामिण रूग्णालय मुदखेड च्या माजी कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ शेख अहेमद यांनी 24 वेगवेगळया विषयामध्ये पदव्या प्राप्त करून तसेच 60 पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रिय स्तरावर संशोधनात्मक रिसर्च पेपर देखिल त्यांनी प्रकाशित केलेली आहेत आणि 12 आंतरराष्ट्रिय दर्जाचे पुस्तके प्रकाशित केली आहेत, 11 डेझर्टेशन्स वेगवेगळ्या विदयापिठात सादर केलेली आहेत आणि 350 पेक्षाही जास्त परीक्षा देऊन भारत देशात एक ऐतिहासिक प्रकारचा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे.

त्यांच्या या अदभूत शिक्षणाची दखल घेत त्यांची नोंद “ *वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड*” ने दिल्ली येथे दि. 1 फेब्रूवारी 2020 रोजी लाजपत भवन या ठिकाणी त्यांच्या 100 व्या ईव्हेंट मध्ये मेडिया च्या साक्षिने “ *दि मोस्ट एजूकेटेड परसन ऑफ ईंडिया”* या शिर्षकाखाली ऐतिहासिक नोंद करण्यात आली. या कार्यक्रमास दिल्ली येथिल डॉ. ऊदित राज माजी खासदार दिल्ली, सिमा राज इनकम टॅक्स कमिशनर दिल्ली, वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड चे अध्यक्ष वेद प्रकाश आणि निरू सेहगल यांच्या हस्ते हा पूरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्लीकर पण त्यांच्या या अभूतपूर्व यशाने भाराऊन गेलेत त्यांना क्षणभर विश्वास होईना की आज आपन या महान व्यक्तिला आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहात आहोत.

शोकांतिका एव्हढिच आहे की जे काम गल्लित व्हायला पाहिजे होते ते काम आज दिल्लीने करून दाखविले. स्थानिक पातळिवर त्यांच्या या यशाची साधी दखल ही कोणि घेतली नाही आणि आज तो आंतरराष्ट्रिय स्तरावर विश्वविक्रम नोंदवून भारत देशात ईतिहास रचला आहे. एका सर्वसाधारण मूस्लिम समाजातिल ड्रायव्हरच्या मूलाने ते करून दाखविले आहे जे भल्याभल्यांना जमले नाहि. आजच्या युगातिल शेख अहेमद हे नांव शैक्षणिक क्षेत्रात एक आयकॉन, आयडॉल बनले आहे.

या व्यतिरिक्त त्यांची… *1) वजरा बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 2) क्रेडेंस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 3) व्रिक्षा बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 4) कॉसमॉस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 5) फाऊंडेशन रेकॉर्ड ऑफ ईंडिया 6) ईंडिया स्टार रिपब्लिक अवार्ड-2020* या विश्वविक्रमात नोंद घेण्यात आली आहे आणि अजुनही काही वर्ल्ड रेकॉर्ड चे घोषना व्हायची आहे.

आज शेख अहेमद यांची भारतातील ऊच्च्यविद्यविभूषित व्यक्तिंच्या पंक्तित गणती होते. अतिषय प्रतिकूल परिस्थितिवर मात करित त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्यांचे स्वप्न हे वैदयकिय अधिकारी बनण्याचे होते परंतू हे स्वप्न अधुरेच राहिले तरिदेखिल खचुन न जाता आयुष्याचे यश अपयश पचवत जिवनाचा संघर्ष सुरूच होता. परंतु हे यशाचे शिखर गाठण्यासाठी संघर्षाला ही लाज वाटेल असा चित्त्त्तथरारक प्रवास करावा लागला. हे शिक्षण प्राप्त करण्यासाठि प्रसंगी कधी कधी ऊपासमारीचे चट्केही खावे लागले आहेत. दिवंगत माजी आरोग्य मंत्री डॉ. श्रिकांत जिचकार यांचे आत्मचरित्र वाचून त्याचा त्यांच्या जिवनावर जबरदस्त प्रभाव पडला.

*त्यांनी प्राप्त केलेल्या पद्व्या हया पुढिलप्रमाणे आहेत*…

1) एस.एस.सी. श्री शाहू महाविदयालय भोकर येथून विशेष प्राविण्यासह ऊत्तिर्ण 2) एच.एस.सी. (वीज्ञान) 3) बि. एस्सी.(केमेस्ट्रि), 4) एम.एस्सी.( ईकोलॉजी अ‍ॅंड ईनव्हायर्णमेंटल सांयन्स ), 5) एम.एस्सी. (केमेस्ट्रि ), 6) एम.एस्सी.( ईनफोरमेशन टेक्नोलॉजी), 7) एम.ए. (ईंग्लिष लिट्रेचर), 8) एम.ए. (क्लिनिकल सायकोलॉजी), 9) एम.ए. (हयुमन राईट्स), 10) एम.ए. (ईकॉनोमिक्स), 11) एम.ए. (रूरल डेव्हलपमेंट), 12) एम.फिल.ईन (सोशल वर्क), 13) पिएचडी ईन (ईनव्हायर्णमेंटल सांयन्स), 14) एम.बी.ए. ईन (मार्केटिंग मॅनेजमेंट), 15) मास्टर ऑफ सोशल वर्क (मेडिकल अ‍ॅंड सायकियाट्रिक) हा पद्व्युत्त्तर हा अभ्यासक्रम आऊटस्टॅंडिंग ग्रेड मध्ये ऑरेंज सिटि कॉलेज नागपूर टॉपर 16) आय.टि.आय. डिप्लोमा (वेल्डर) भोकर येथून टॉपर, 17) डिप्लोमा ईन ऑटोकॅड 18) अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा ईन नेटवर्किंग ईंजिनिअरिंग, 19) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा ईन मेडिकल लॅब टेक्नोलॉजी ग्रामिण तंत्रनिकेतन नांदेड येथून टॉपर, 20) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा ईन रूरल डेव्हलपमेंट, 21) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा ईन फॉरेंन्सिक सांयन्स अ‍ॅंड क्रिमिनोलोजी, 22) बी.जे.(बॅचलर ऑफ जर्नालिझम), 23) एल.एल.बी. A प्लस ग्रेड विथ डिस्टिंक्शन मध्ये ऊत्तिर्ण केला. 24) एम.जे.(मास्टर ऑफ जर्नालिझम) महाराष्ट्रा टॉपर, 25) एल.एल.एम. ईन (क्रिमिनोलॉजी) 26) एम.टि.एम. मास्टर ऑफ टूरिझ्म अ‍ॅंड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (अ‍ॅपिअरड) या पदव्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त त्यांना मानद 6 पदव्यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

भारत देशात ज्या वेळेस कंत्राटी कामगारांचा ईतिहास लिहिला जाईल त्या वेळेस शेख अहेमद यांचे नांव हे सुवर्ण अक्षरात नोंद केले जाईल. ईतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी आणि शैक्षणिक क्षेत्रातिल महामेरू म्हणुन संबोधता येईल असे नांव म्हणजे शेख अहेमद होय. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झर्याने ज्ञानदेवता सरस्वतिलाही अक्षरश: मोहुन टाकल. त्यामुळेच आपल्या अपार बूदधिमत्त्तेच्या जोरावर त्यांनी एक ही वर्ष वाया जाऊ न देता या पद्व्यांवर आपल नांव कोरल. याच्याव्यतिरीक्त ते ऊत्त्तम संवादपटु आणि मिमिक्रि आर्टिस्ट म्हणुन देखिल प्रसिद्ध आहेत. शेख अहेमद यांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतुन मिळवल्या आहेत. तो भोकर येथील सेवानिव्रुत्त्त चालक शेख ईस्माईल यांचा मुलगा आणि कॉंग्रेस पार्टीचे ऊपनगरअध्यक्ष ईनामदार साबेरा बेगम यांचे जावाई आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोकर येथिल जिल्हा परीषद नुतन शाळा येथुन पुर्ण केले आहे आणी शाहू महाविदयालयाचा तो माजी विद्यार्थी आहे. या दोन्ही शाळांना त्यांच्या जिवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या जिवनात ग्रामिण रूग्णालय मुदखेडला देखिल तेवढेच महत्त्व आहे आणि हे एक प्रकारचे विदयापिठ ठरले आहे त्यांच्यासाठी जो धडा एवढे शिक्षण घेऊन पण मिळाले नाही ते या ग्रामिण रूग्णालय मुदखेडच्या चार भिंतिच्या आत शिकायला मिळाले. इ.स. 2011 मध्ये त्यांना सौदि आरामको या कंपणि मध्ये लिपिक या पदासाठी परदेशात जाण्याची संधी मिळालि होती आणि त्याचवेळेस या कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथिल आदेश प्राप्त झाले. तेंव्हा परदेशात न जाता आपल्याच देशात नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे भविष्यात स्थायी होण्याची संधी मिळेल ही आशा होती. ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे त्यावेळेस अधिकारीही चांगल्या स्वभावाचे आणि कर्मचार्यांना सोबत घेऊन प्रशासन चालविणारे होते. त्यामुळे ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे सुरूवातीचे काहि वर्ष चांगल्या प्रकारे गेले. आणि अचानक येथे कान, नाक आणि घसा तज्ञ अहर्ता प्राप्त वैदयकिय अधिक्षक वर्ग-1 यांची नियूक्ति झाली आणि प्रशासनाचा खलनायकि चेहरा समोर आला. याच ठिकाणाहुन शेख अहेमद यांच्या आयूष्याचा खरा संघर्ष सूरू झाला. त्या हिटलर शाही आणि मनोरूग्ण पद्ध्तिच्या वैदयकिय अधिक्षक च्या आडमूठेपणामुळे वरीष्ठांचे आदेश असतांना देखिल कामावर रूजू करून न घेतल्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली, पोलिस स्टेशन मुदखेड येथे एन.सी. दाखल करावी लागली आणी 4 महिण्याच्या अथक परिश्रमानंतर ग्रामिण रूग्णालय मुदखेड रूजू करण्यात आले आणि त्या हिटलरशाहा अधिक्षकाची ऐतिहासिक 3 पाणांची तक्रारीवरून कळमनूरी येथे बदली करण्यात आली शेवटी शासनाकडुन त्या वैदयकिय अधिक्षकाची विभागिय चौकषी लावण्यात आली आणि शेख अहेमद यांना सरकारी साक्षिदार बनवण्यात आले. आणि याच ठिकाणी असा अनुभव आला की या क्षेत्रात जर तग धरून रहायचे असेल तर वैदयकिय क्षेत्रातील कायद्याचा दिर्घ अभ्यास असणे अतिआवश्यक आहे. तेव्हां एल.एल.बी. ला प्रवेश घेतला आणि दवाखाण्याची पायरी चढ्ण्यापासून ते दवाखाणा जमिनदोस्त करण्याचे सर्व कायद्यांचा अभ्यास केला.

पुढे 1 वर्ष ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे *डॉ. कपिल जाधव* यांच्या काळात येथील प्रशासन सुरळित चालले होते तोच अचानक प्रसिध्ध पोटविकार तज्ञ आणि एंडोस्कोपी विषेशज्ञ यांची वैदयकिय अधिक्षक या पदावर ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे नियूक्ति करण्यात आली आणि आपल्या पूर्विच्या मित्राचा वचपा घेण्यास सूरुवात त्यांनी केली आणि बिनबूडाचे आरोप लाऊन मेमो देण्याचा खेळ सूरू झाला. त्या वैदयकिय अधिक्षकाची नियूक्ती ही फक्त शेख अहेमद यांच्यासाठिच करण्यात आली की काय अशी शंका वाटायची कारण काही कर्मचार्‍यांच्या कक्षाला कुलुप लाऊण असायचे आणि काही कर्मचारी हे घरी बसून पगार घ्यायचे तरिपण त्यांच्यावर कोणतिहि कारवाही व्हायची नाहि. समजून सांगितले तरी तो अधिक्षक ऐकायला तयार होईना. अत्याचाराचा कळ्स गाठला होता आणि अशातच शेख अहेमद यांची एकुलती एक बहीण अचानक आजारी पड्ली आणि आयसियु मध्ये अ‍ॅड्मिट करावे लागले. त्यांच्या बहीणिचे रक्तगट बी निगेटिव होते आणि दिवसेंदिवस प्रक्रुती खालावत चालली होति आणि रक्त मिळविण्यासाठी रोज तारेवरची कसरत करावी लागायची. रजेचा अर्ज देऊन गेल्यास पण अनुपस्थिती नोंद केली जात होती मेमो देण्याचा खेळ सूरूच होता. तब्बल 10 दिवसांनी शेख अहेमद यांच्या बहीणिचे निधन झाले आणि दूखाचे डोंगर कोसळले आणि 2 दिवस कामावर जाऊ शकले नाही त्यामुळे वैदयकिय अधिक्षक यांनी त्यांच्या कार्यालयात बोलाविले आणि कामावर न येण्याचे कारण विचारले तेंव्हा त्यांनी संगितले की माझ्या बहीणिचे निधन झाले त्यामुळे मी येऊ शकलो नाही. तेंव्हा त्या वैदयकिय अधिक्षकाचे ऊत्त्तर होते हे तर चालतच राहते आणि लिपिकाला बोलाऊन परत मेमो काढण्यास सांगितले. तेंव्हा शेख अहेमद यांनी कार्यालयाच्या बाहेर पडत आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि म्यानेतुन लेखणी बाहेर काढली आणि पूढे जे घडले ते महाराष्ट्रातिल आरोग्य क्षेत्रास हादरा देणारी एकमेव घटणा घडली वैदयकिय अधिक्षकाचा नांदेड येथिल डॉक्टर लेन परिसरातिल खाजगी दवाखाना शेख अहेमद यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नंतर अक्षरश: प्रशासनाने सिल केला. त्या वैदयकिय अधिक्षकाला पळ्ता भुई सापडेना आणि आपली ऊरली सुरली अब्रूचा गाशा गुंडाळत नोकरिचा राजिनामा द्यावा लागला. अशाप्रकारे न घाबरता दोन – दोन दिग्गज, प्रशासनात मूरलेल्या धनाढ्य, अनूभवि सेवानिव्रुत्तिच्या ऊंबरठयावर पोहोचलेल्या त्या दोन वैदयकिय अधिक्षकांच्या अत्याचाराविरूद्ध पेटुण ऊठुण संघर्ष करणारा आणि त्यांचे पानिपत करनारा आरोग्य विभागातिल हाच तो “ *अ‍ॅंग्रि यंग मॅन”*.

त्यांचे स्वप्न हे वैदयकिय अधिकारी बनण्याचे होते परंतू हे स्वप्न अधुरेच राहिले परंतू त्यांनी डॉक्टरांसाठि जे कायदे आहेत त्याबद्द्ल “ *मेडिकल ईथिक्स अ‍ॅंड लेजिसलेश्न्स फॉर डॉक्टर*” हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. आज *Google, AMAZON, FLIPCART, GOOGLE BOOKS वर Dr. SHAIKH AHMAD* हे नाव टाईप केल्यास आपल्यास त्यांची माहिति मिळून जाईल. त्यांच्या स्वर्गवासी बहिणीचे स्वप्न होते कि माझ्या भावाने या देशात खुप मोठे नांव करावे आणी आज खर्‍या अर्थाने त्यांनी आपले नांव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून या देशात आजरामर करून आपल्या बहीणिला श्रदधांजली वाहिली आहे.

त्यांनी मुदखेड येथिल अडचणिच्या काळात साथ देणार्या शेख जब्बार (मामू), मोहमद बूरहान, मोहमद हुसेन, शेख मूजिब, शेख ईरफान पत्रकार, सचिन कांबळे पत्रकार, नगर अध्यक्ष मूजिब जहागिरदार सर यांचे आभार मानले आणि मुदखेड येथिल सगळ्या जनतेचे आभार मानले. तसेच ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथिल संपूर्ण कर्मचार्‍यांचे आभार मानले.

*संपूर्ण महाराष्ट्राचा शेख अहेमद या अवलियास मानाचा सलाम* ……….👏👏

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading