अमोल अशोक सोनोली (विश्वनाथनगर नांदेड), असे आरोपीचे नाव आहे. हा तरुण मागील एक वर्षापासून पीडित तरुणीचा पाठलाग करत होता. तुझे माझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणून तो तरुणीची छेड काढत होता. मात्र, तरुणीने त्याला विरोध केला. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अमोलने तरुणीचा मोबाईलमध्ये फोटो काढला. तसेच माझ्यासोबत लग्न नाही केले तर फेसबुक, व्हाट्सअपवर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत अमोलविरुद्ध तक्रार दिली. त्यावेळी विमानतळ पोलिसांनी तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आ