नाशिक :14 oct.येथील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने ७ मुलांना धडक दिली. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून इतर मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमी मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशाल पवार (वय ११) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.इंदिरानगर परिसरातील १० ते १५ वयोगटातील मुले पहाटे ३ वाजता कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी चालली होती. त्यावेळी अज्ञात वाहनाने मुलांना धडक देऊन वाहनचालक वाहन घेऊन फरार झाला. ही घटना इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक जवळ साईनाथ चौफुली येथे घडली. परिसरातील नागरिकांनी जखमी मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.