नांदेड – राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला भविष्य नसल्यामुळेच प्रियंका गांधी यांना समोर आणले जात आहे, असे वक्तव्य भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे. नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला भविष्य नसल्यामुळेच प्रियंका गांधी यांना समोर आणले जात आहे, असे उत्तर दिले