गजाळीने  मारहाण केल्याच्या आरोपातून तिघांची  निर्दोष मुक्तता

IMG-20181023-WA0178
वकील तौफिक कुरेशी
किनवट,ता.२२(बातमीदार):  धम्मरत्न  पाटील, राहणार -समतानगर,किनवट यांच्या  फिर्यादी वरून ता.५ नोव्हेंबर २०१५ रोजी  आरोपी नामे अजय  पाटील, मारोती  पाटील व नंदा  पाटील सर्व  राहणार समतानगर,किनवट     यांच्या विरुद्ध भादवि च्या  विविध कलमान्वये  गुन्हा नोंद करून किनवट न्यायलयात दोषारोप  पत्र  दाखल करण्यात  आले होते.या प्रकरणात सरकार  पक्षाने  एकूण  ७ साक्षीदार तपासले  व न्यायालयाने  दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून ता.१७/१०/२०१८ रोजी तिन्ही  आरोपीना वरील  गुन्ह्यातून न्यायमुर्ती जे.एन.जाधव यांनी  निर्दोष मुक्त  केले. आरोपी तर्फे येथील  वकील तौफिक कुरेशी यांनी काम  पाहिले.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading