मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

0 34
सकाळी १० वाजता आयटीआय चौकातून या महामोर्चाची सुरुवात करण्यात आली. राफेल विमानाचे प्रतिकात्मक चित्र घेऊन भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भात एक निवेदन देण्यात आले. या महामोर्चात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, आमदार संपत कुमार नांदेडचे माजी पालकमंत्री आमदार डी.पी.सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार अमिताताई चव्हाण,आमदार अमर राजूरकर,माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, भाऊरावचे चेअरमन गणपतराव तिडके, नामदेवराव केशवे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते