अल्पसंख्यांक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजन 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 1 :- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2018-2019 साठी अल्पसंख्यांक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत होती. पंरतु, आता 15 ऑक्टोंबर, 2018 ऑनलाईन अर्ज भरता येतील.सन 2018-2019 या वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2018-2019 या वर्षी नुतणीकरण व नवीन विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता यावी व जास्तीत – जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा) बालासाहेब कुंडगीर यांनी केले आहे

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading