औरंगाबाद | हर्षवर्धन जाधव यांनी आगामी निवडणुकांचं रणशिंग फुकलं आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणूक मी स्वःताच्या पक्षाकडून लढवणार असल्याची घोषणा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.औरंगाबादच्या चिंतन बैठकीत मी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून मी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला. त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे.दरम्यान, लोक नव्या पर्यायाच्या शोधात असल्याचे मला जाणवू लागले आहे, आणि मी त्यांच्यापुढे नवा पर्याय म्हणून जाण्याचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले