नांदेड:पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी

जिल्हा मराठी पत्रकार संघाची खा.चव्हाणांकडे मागणी
नांदेड/प्रतिनिधी-पत्रकार भवनासाठी स्व.सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक भवनाच्या वरच्या मजल्यावर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवन निर्माण झाले आहेत. नांदेडमध्ये मात्र पत्रकार भवन अजुनही होवू शकले नाही. शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या नाना-नानी पार्क स्थित स्व.सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरीक भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पत्रकार भवनासाठी मनपाने जागा उपलब्ध करुन दिल्यास हे पत्रकार भवन सर्वांच्या सोईचे होणार असल्याने या बाबत मनपातील पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनास शिफारस करावी, अशी विनंती यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, सरचिटणीस सुभाष लोणे, अभय कुळकजाईकर, सचिन डोंगळीकर, ऍड.शाहेद, महंमद सादीक, करणसिंह बैस आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Leave a comment