शहरातील वाजीराबद परिसरात राहणारे बवनसिंग भाटिया आणि त्याचा मित्र ऋषीकेश वैद्य हे दोघेही गोदावरी नदी परिसतील गोवर्धनघाट या ठिकाणी गप्पा मारत बसले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. एकाकडे तलवार तर दुसऱ्याकडे पिस्तूल होते. ऋषीकेश वैद्य यांच्या पोटावर तलवारीने घाव घालून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तर दुसऱ्याने बवनसिंग भाटिया यांच्यावर पिस्तुल रोखून रोख रक्कम काढून घेतली. जवळपास १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेनंतर परिसरातील दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध शहरातील वाजीराबद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पठारे करीत आहेत.