सिल्लोड नगर परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा,26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय

सिल्लोड दि 28 : सिल्लोड नगरपारिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणूकीत काँग्रेसने 26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवून पुन्हा हा काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. तसेच कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री राजरत्न निकम ह्या जवळपास आठ हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत.भाजपला गेल्यावेळेच्या जागा देखील राखता आलेल्या नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. भाजपला फक्त एकाच प्रभागात फक्त २ जागांवर विजय मिळवता आला आहे. बाकीच्या पक्षांचा सुपडाच साफ झाला.
या निवडणुकीत वॉर्ड क्र.३ वगळता इतर सर्वच वॉर्डांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.


वॉर्ड क्रमांक १ मधून सुनील दुधे व मालतीबाई डोभाल,
वॉर्ड क्र. २ मधून कडुबाई विठ्ठल सपकाळ व बेग चाँद उस्मान मिर्झा हे काँग्रेस उमेदवार विजयी झाले.
वॉर्ड क्र. ३ मधून भाजपप-शिवसेना युतीच्या रुपाली मनोज मोरेल्‍लू व अश्‍विनी किरण पवार यांनी विजय मिळविला.
वॉर्ड क्र. ४ मधून देशमुख नाजिया परवीन मतीन अहमद व शेख आसिफ नबी बागवान,
वॉर्ड क्र. ५ मधून शेख रऊफ मुसा बागवान व सविता मनोज झंवर,
वॉर्ड क्र. ६ मधून अब्दुल नफीसा बेगम अब्दुल सत्तार व शेख़ अब्दुल सत्तार हुसेन आजम हुसेन हे विजयी झाले.
वॉर्ड क्र. ७ मधून सुधाकर पंडित पाटील व शेख शबाना शेख बाबर बागवान,
वॉर्ड क्र.८ मधून नंदकिशोर विठ्ठलराव सहारे व कल्याणी राजेंद्र गौर हे विजयी झाले.
वॉर्ड क्र.१० मधून सय्यद समीनाबी अनिस व विद्यमान नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी विजय मिळवला.
वॉर्ड क्र.११ मधून शकीलाबी पठाण व जुम्माखान गुलशेरखान पठाण,
वॉर्ड क्र.१२ मधून नसीमबी शेरखान पठाण व रईसखान शेरखान पठाण तर
वॉर्ड क्र.१३ मधून शकुंतला दामोदर बनसोड व शेख मोहसीन अब्दुल रहीम हे निवडून आले.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading