शिवसेनेसोबत खासगीत युतीची चर्चा; चंद्रकांत पाटील

मुंबई | आगामी निवडणुकीत युती करावी म्हणून शिवसेनेसोबत खासगीत चर्चा सुरू आहे, असा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.येणाऱ्या निवडणुका शिवसेना भाजपने एकत्र लढवायच्या आहेत, असा प्रस्तावही शिवसेनेला दिला आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.दरम्यान, येणाऱ्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्षष्ट केलं आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. शिर्डीतील दौऱ्यातून श्रीगणेशाही केला आहे.त्यामुळे भाजपच्या जेष्ठ नेत्यानं असं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading